
हिवाळा आल्यानंतर सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. चेहरा, हात-पाय, ओठ, कोपरे—सगळीकडे ताण जाणवू लागतो. मार्केटमध्ये अनेक क्रीम-लोशन्स उपलब्ध असले, तरी आयुर्वेदात वर्णन केलेले शतधौत घृत हे एक अत्यंत प्रभावी, नैसर्गिक आणि रसायनमुक्त मॉइश्चरायझर आहे.
शतधाौत घृत म्हणजे शंभर वेळा धुतलेले तूप, आणि हाच प्रक्रियेचा गाभा त्याला विशेष गुण देतो.
शतधौत घृत म्हणजे काय?
१.तूप १०० वेळा थंड पाण्याने धुतल्यावर त्याची संरचना बदलते.
२.धुतल्यावर तूप मृदू, थंड, क्रीमी आणि त्वचेत लगेच मुरणारे बनते. यामुळे:
३.तूपाची उष्णता कमी होते,त्याची शीतल, रुक्ष त्वचा शांत करणारी गुणवत्ता वाढते,तूपातील पोषक घटक त्वचेमध्ये खोलवर शोषले जातात.
हिवाळ्यात शतधौत घृत का वापरावे?
१. खोलवर पोषण (Deep Moisturization)हिवाळ्यात त्वचेतील ओलावा वेगाने कमी होतो. शतधौत घृत चेहरा आणि शरीराला खोलवर पोषण देऊन त्वचा मऊ ठेवते.
२. कोरडी, संवेदनशील त्वचेसाठी उत्तम रसायनमुक्त असल्याने ॲलर्जी, लालसरपणा, खाज कमी करण्यात उपयोगी.
३. त्वचेची जळजळ, क्रॅक्स कमी करते.हात-पायांना होणारे क्रॅक्स, ओठ फाटणे, नाकाभोवती होणारी सोलणे यासाठी उपयोगी.
४. बाळांची त्वचा मऊ ठेवते मुलांच्या रूक्ष व कोरड्या त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित.
५. अँटी-एजिंग फायदा- त्वचेतील कोलेजनला सपोर्ट देते, सुरकुत्या कमी दिसतात, ग्लो वाढतो.
कसे वापरावे?
१. चेहरा मॉइश्चरायझर म्हणून
चेहरा स्वच्छ धुवा. मटाराच्या दाण्याएवढे शतधौत घृत घ्या. हलक्या हाताने मसाज करत त्वचेत मुरू द्या
सकाळी व रात्री वापरल्यास उत्तम परिणाम
२. बॉडी बटर म्हणून
आंघोळीनंतर ओलसर त्वचेवर लावा. गुडघे, कोपरे, टाचा विशेषतः चांगले मुरवा.
३. ओठांसाठी नॅचरल लिप बाम
फाटलेले ओठ भरावे, नरम होतात.
४. हिवाळ्यात हात-पायांना क्रॅक्ससाठी रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर लावा—फायदा जाणवेल.
कुठल्या त्वचेवर खास उपयोगी?
अत्यंत कोरडी (Dry) त्वचा
संवेदनशील (Sensitive) त्वचा
क्रॅक-प्रोन त्वचा
मुलांची नाजूक त्वचा
ऍलर्जी किंवा रॅशेस होणारी त्वचा
टीप: अतिऑयली, पिंपल-प्रोन त्वचेवर जपून वापरावे.
हिवाळ्यातील कोरडेपणा आणि त्वचेची निगा राखण्यासाठी शतधौत घृत हा एक सर्वात उत्तम, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्याय आहे. नियमित वापराने त्वचा मऊ, नितळ आणि उजळ दिसते. कोणतेही रसायन, कृत्रिम सुगंध किंवा प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे घरच्या घरी सुरक्षितपणे वापरता येते.
ऑर्डर करण्यासाठी:8928287182 या क्रमांकावर संपर्क करा